नातवाने केली आजीची कुऱ्हाडीने हत्या

On: October 18, 2021 8:20 AM

मालेगाव : आजी सतत त्रास देत असल्याच्या रागातून नातवाने आजीची हत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्रंबकेश्वर तालुक्यातील वायघोळपाडा येथे उघडकीस आली. पारीबाई हरी शेवरे (65) असे मयत महिलेचे तर कृष्णा लक्ष्मण शेवरे (22) असे आजीची हत्या करणा-या नातवाचे नाव आहे.

आजी व नातू यांच्यात सतत वाद होत असल्याने रागाच्या भरात नातू कृष्णा याने आजी पारीबाई शेवरे हिच्यावर कु-हाडीने हल्ला चढवत तोंडावर व गळ्यावर वार केले. या हल्ल्यात पारीबाई जागीच ठार झाल्या. घटनेनंतर फरार झालेल्या नातूला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हरसुल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment