चाकूच्या घावात पत्नीने केली पतीची हत्या

On: October 18, 2021 8:38 AM
crimeduniya

धुळे : झोपलेल्या पतीच्या गळ्यावर चाकूचे घाव घालत पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना साक्री तालुक्यातील कुडाशी येथे उघडकीस आली आहे. हत्येनंतर रक्ताने माखलेला चाकू पत्नीने पतीच्या हातात ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मयत पती हा झारखंड येथील मुळ रहिवासी आहे. नरेश रामू कुमार (35) असे मयत पतीचे तर सुरेखा असे हत्या करणा-या पत्नीचे नाव आहे.

रोजगारानिमित्त झारखंड येथून कुडाशी येथे आलेल्या या पती पत्नीत नेहमी वाद होत असत. पती व मुले गाढ झोपेत असल्याची संधी साधत सुरेखाने पती नरेश याची चाकूचे वार करत हत्या केली. हत्येनंतर सुरेखाने चाकू पतीच्या हातात ठेवला.

मयतास मद्यपान करण्याचे व्यसन होते. तो पत्नी सुरेखाच्या चारित्र्यावर संशय घेत होता असे समजते. सुरेखाला अनुक्रमे दिड व सात वर्षाची मुले आहेत. या घटनेप्रकरणी पिंपळनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सुरेखाला अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment