डोक्यात दगड घालून एकाचा खून

On: October 18, 2021 8:57 AM

अहमदनगर : किरकोळ वादातून दोघात झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर तालुक्यातील वाळकी येथे रवीवारच्या दुपारी घडली. जावेद गनीभाई तांबोळी (38)असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे वाळकी परिसरात खळबळ माजली आहे.

भांड्याचे व्यापारी गनीभाई तांबोळी यांचा मुलगा जावेद दुपारच्या वेळी घरी आला. त्यावेळी त्याचा शेजा-यांसोबत वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने डोक्यात दगड लागून तो मृत्युमुखी पडला. नगर तालुका पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment