पोलिसांच्या वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा

On: October 20, 2021 8:33 AM

अकोला : गस्तीवरील पोलिसांनी खदान परिसरातील युवकांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी अकोला रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना खदान परिसरात पोलिसांना १० ते १२ युवक दिसून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यातील एकाने पोलिसांना शिविगाळ करीत हातातील काचेची बॉटल फेकून मारली. त्यात पोलिसाच्या वाहनाची काच फुटली व नंतर युवक पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

स.पो.नि. योगिता ठाकरे यांच्यासह पो.ना. नीलेश तिरपुडे, नासिर खान पठाण असे रात्र गस्तीवर असतांना रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास युवकांचे टोळके त्यांना दिसले. त्यांना हटकले असता काही युवक पळून गेले. मात्र त्यातील एकाने मी येथील डॉन आहे, तुम्ही मला विचारणारे कोण असे म्हणत शिवीगाळ करत सरकारी वाहनाचे नुकसान केले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment