कैलास हटकरच्या जुगार अड्ड्यावर तिसरा छापा

On: October 28, 2021 9:51 PM

जळगाव : सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या अख्त्यारीतील पथकाने रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावर आज दुपारी छापा टाकला. कैलास हटकर याच्या नियंत्रणाखाली खंडेराव नगर पुलाजवळ चालणा-या जुगार अड्ड्यावर सलग तिस-या वेळेस हा छापा पडला आहे. या कारवाईमुळे सट्टा व्यावसायिकांच्या गोटात खळबळ माजली आहे. पो.कॉ. आकाश राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमनाथ उमप, मुरलीधर कुंभार, अशोक भोई व मुकेश राठोड अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सट्टा जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकुण 16 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील इतर पोलिस स्टेशन हद्दीत देखील जुगार अड्ड्यावरील कारवाया करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment