तिजोरी पळवून नेणारे दोघे अटक

On: October 29, 2021 9:49 PM

जळगाव : जळगाव शहरातील विसनजी नगर परिसरातील कृषी औद्योगीक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर दरोडा टाकून तिजोरी पळवून नेणा-या दोघा आरोपींना पकडण्यात आले आहे. रणजीत सिंग जुन्नी यास जळगाव शहरातून व सागरसिंग बावरी यास जालना येथून अटक करण्यात आली आहे.

जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस नाईक सलीम तडवी, पोलीस शिपाई विकास पहुरकर, समाधान पाटील, रवींद्र साबळे, माधव कांबळे, रिहान शेख आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. दोघांकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment