महिला पीएसआयवर गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न

On: October 30, 2021 6:29 AM

पुणे : पोलिस उप निरीक्षक महिलेवर गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न करणा-या सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध पुण्यातील खडकी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे खोटे सांगून शारीरीक व मानसिक छळ करत संबंध ठेवल्याचे पिडीत महिला पीएसआयने फिर्यादीत म्हटले आहे. सन 2013 पासून सुरु असलेला हा प्रकार कळंबोली, नवी मुंबई तसेच स.पो.नि. च्या खडकी येथील घरात झालेला आहे. आपल्यासोबत अनैसर्गीक कृत्य केल्याचे देखील पिडीत पोलिस उप निरीक्षक महिलेने म्हटले आहे. पुणे येथील बंड गार्डन पोलिस स्टेशनला नेमणूकीस असलेल्या व खडकी येथे राहणा-या सहायक पोलिस निरीक्षकावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment