पैठण तहसीलदारांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

On: October 30, 2021 7:48 AM

औरंगाबाद : पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायधिश कदम यांनी फेटाळला आहे. अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांकडून 1 लाख 30 हजार रुपयांची लाच मागणीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू वाहतुकीची परवानगी देण्याकामी तहसीलदार चंद्रकांत शेळके व खासगी व्यक्ती नारायण वाघ अशा दोघांनी तक्रारदाराकडे 1 लाख 30 हजार रुपयांची लाचेची हप्त्याच्या स्वरुपात मागणी केली होती. तक्रारदाराने पंचांसमक्ष तहसीलदार शेळके यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी लाचेला प्रोत्साहन देत वाघ यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले होते. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून तहसीलदार शेळके फरार असून अटक टाळण्याच्या प्रयत्नात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment