मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक

On: October 31, 2021 8:25 PM

जळगाव : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केला असून पुढील तपासकामी त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. समाधान प्रल्हाद पाटील (कस्तुरी नगर जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गु.र.न. 400/21 भा.द.वि. 380 नुसार गुन्हा दाखल आहे. त्याच्या ताब्यातून चोरीचा सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पो.नि. किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, पो.हे.कॉ.लक्ष्मण पाटील, पो ना किशोर राठोड, पो.ना. रणजित जाधव, पो.ना. कृष्णा देशमुख, पो.कॉ. विनोद पाटील, पो.का.ईश्वर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment