पोलिसाने केले दुसरे लग्न? – जामनेर पोलिसात गुन्हा

On: November 1, 2021 6:56 AM

जळगाव : पहिली पत्नी हयात असतांना पोलिस पतीने परस्पर दुसरा विवाह केल्याच्या आरोपाखाली जळगाव पोलिस दलातील कर्मचा-याविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा देवपूर – धुळे येथून शुन्य क्रमांकाने जामनेर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. संजय शांताराम खंडारे असे दुसरा विवाह केल्याचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. संजय खंडारे जळगाव पोलिस दलात कार्यरत असल्याचे म्हटले जात आहे.

धुळे येथील नेहरु नगर (देवपुर) मास्तरवाडी परिसरात राहणा-या महिलेने याप्रकरणी देवपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पती संजय खंडारे यांनी दुस-या महिलेसोबत परस्पर दुसरा विवाह केला असा सदर तक्रारदार फिर्यादी विवाहितेचा आरोप आहे. देवपूर पोलिसांनी शुन्य क्रमांकाने गुन्हा नोंद केला. त्यानंतर जामनेर हद्दीत घटनास्थळ असल्यामुळे जामनेर पोलिसात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment