मोबाईल, रोकड व दागिने चोरट्यांनी केले लंपास

On: November 2, 2021 10:52 PM

जळगाव : दिवाळी सुरु झाल्यानंतर विविध ठिकाणी चोरट्यांनी आपली करामत दाखवणे सुरु केले आहे. जळगावच्या सैय्यद असरार नगर परिसरात राहणा-या इस्टेट ब्रोकरच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

शेख सलीम शेख रशीद ( सय्यद असरार नगर मासुम वाडीच्या बाजुला) हे 1 नोव्हेंबरच्या रात्री घरात झोपले होते. दुस-या दिवशी सकाळी घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत सात हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, पंचवीस हजार रुपये रोख, तेवीस हजार रुपये किमतीचे दागिने व पाचशे रुपयांचे पितळी भांडे असा एकुण 55 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला नेला आहे. या घटनेचा पुढील तपास हे.कॉ. रामकृष्ण पाटील व सचिन पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment