जळगाव : जळगाव शहरातील दोघा शासकीय विश्रामगृहापैकी एका ठिकाणी तरुणीवर अत्याचार झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर गाजली. अत्याचार करणा-या दोघांपैकी एक बडा राजकीय नेता आणि दुसरा त्याचा साथीदार असल्याचे म्हटले गेले.
क्राईम दुनियाने याबाबत कानोसा घेतला असता कुठे तरी पाणी मुरत असल्याची जोरदार चर्चा ऐकण्यात आली. मात्र ठोसपणे पुढे येण्यास तरुणी तयार नसल्याचे देखील समजते. पिडीत तरुणीला गोपनीय पद्धतीने परगावी उपचारार्थ हलवण्यात आल्याचे म्हटले गेले.
ज्या तरुणीवर अत्याचार झाल्याचे म्हटले जात आहे ती तरुणीच समोर येत नसल्याचे वा तिला येऊ दिले जात नसल्याची जोरदार चर्चा या निमित्ताने क्राईम दुनियाला समजली.
तथापी जळगाव शहरातील मीडिया या घटनेचा कसून शोध घेत आहे. सत्य समोर येत नाही तोपर्यंत या चर्चेला ठोस आधार नसल्याचे म्हणता येईल. मात्र कुठेतरी आग लागल्याशिवाय धुर निघत नसल्याचे जळगावकर आता खुलेआम बोलू लागले आहेत.