घरगुती गॅसची वाहनात रिफिलिंग – मुद्देमालासह दोघे ताब्यात

On: November 20, 2021 3:01 PM

जळगाव : घरगुती गॅसची वाहनात अवैधरित्या रिफिलिंग करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मुद्देमालासह अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. भुषण प्रदीप तोमर (23) रा.बैठक हॉल जवळ कुसुम्बा आणि अंबादास मंगलसिंग जाधव (रा. श्रीकृष्ण नगर सुप्रीम कॉलनी) अशी दोघांची नावे आहेत.

जळगाव औरंगाबाद महामार्गावरील रायपूर फाट्या नजीक अनु पान मसाला या टपरीत दोघे जण वाहनात घरगुती गॅस रिफिलिंग करतांना पोलीस पथकाला आढळून आले. त्यांच्या ताब्यातून भरलेले चार व एक रिकामे असे पाच घरगुती गॅस सिलेंडर, वजन काटा, गॅस भरण्याचा पंप असा 23 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या निर्देशनाखाली पोहेकॉ गफ्फार तडवी, पोलिस नाईक दिपक चौधरी, पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर, सतीश गर्जे, चालक इम्तियाज आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment