चाकू हल्ल्यातील आरोपीस अटक

On: November 22, 2021 9:52 PM

जळगाव : दोघा भावांचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकू हल्ला करणा-या हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील कुसुंबा येथे 20 नोव्हेंबर रोजी सदर घटना घडली होती. या घटनेत आकाश अरुण सोनार हा जखमी झाला होता. चाकू हल्ला करणारा कमलेश जैन घटनेनंतर फरार झाला होता. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुलत भावाच्या घरभरणी कार्यक्रमाला जायचे अथवा नाही जायचे या कारणावरुन कमलेश व पंकज जैन या दोघा भावात वाद सुरु होता.हा वाद शिवीगाळ व हाणामारीपर्यंत येऊन ठेपला होता. या भांडणाचा आवाज परिसरात येत असल्यामुळे जवळच राहणारे आकाश सोनार व पप्पू सोनार हे दोघे तेथे धावत आले होते. पप्पूने कमलेशला व आकाशने पंकज यास बाजूला ओढले होते.

आमच्या वादात तू मध्यस्ती करण्यास का आला असे म्हणत कमलेशने खिशातील चाकू बाहेर काढत आकाशच्या डाव्या बरगडीखाली वार केला होता. त्यात आकाश जखमी झाला होता. हल्लेखोर आरोपी कमलेश कांतीलाल जैन यास हे.कॉ. गफ्फुर तडवी व पो.कॉ. डापकर यांनी कुसुंबा येथील महादेव मंदीर परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment