अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांना अटक

On: November 24, 2021 7:29 PM

जळगाव :अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करुन तिला गर्भवती करणारा व त्याला गुन्ह्यात मदत करणारा त्याचा साथीदार अशा दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अटकेतील दोघांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. तुषार पुरुषोत्तम पवार (19) कसबे वणी ता. दिंडोरी जि. नाशिक व सचिन संजय मराडे (23) खंबाळे ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक अशी दोघा तरुणांची नावे आहेत.

19 जुलै रोजी दुपारच्या वेळी अल्पवयीन मुलीस तुषार पवार याने पळवून नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. या कामी तुषार यास त्याचा मित्र सचिन मराडे याने मदत करुन गुन्ह्यास प्रोत्साहन दिले.

या प्रकरणी सुरुवातीला एमआयडीसी पोलिस स्टेशनला पीडितेला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.अधिक तपासाअंती पीडितेवर अत्याचार व त्यातून ती गर्भवती झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम (4), (5), (एल), (6), 17 आदी कलम वाढवण्यात आले. या गुह्याच्या तपासकामी पो.नि.प्रताप शिकारे यांच्या पथकातील पो.उ.नि. रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, मुकेश पाटील, तुषार गिरासे आदींनी परिश्रम घेतले. अटकेतील आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment