शेतकऱ्यास लुटणारे मुद्देमालासह अटक

On: November 25, 2021 8:55 PM

जळगाव : कपाशी विक्रीचे सात लाख रुपये घरी नेणा-या शेतकऱ्याची पहुर येथे लूट करण्यात आली होती. या गुन्ह्याप्रकारणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने या गुन्हयाचा माग काढत पाच लुटारूंना मुद्देमालासह अटक केली आहे.

गोपाळ हरी पाटील (सोनाळा ता.जामनेर), प्रवीण रमेश कोळी (वाल्मिक नगर जळगाव), गोपाळ श्रावण तेली (कळमसरा ता. पाचोरा), प्रमोद कैलास चौधरी (कळमसरा ता. पाचोरा), लखन दारासिंग पासी(जुना आसोदा रोड जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतील आरोपींनी लुटलेले सात लाख रुपये आपसात वाटून घेतले होते व काही प्रमाणात खर्च देखील केले.

अटकेतील आरोपींकडून 4 लाख 74 हजार 460 रुपये, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, कट्टा, 5 मोबाईल, 2 मोटार सायकली असा एकूण 5 लाख 96 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह सपोनि जालिंदर पळे, उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. संदीप सावळे, जयंत चौधरी, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. विनोद पाटील, ईश्वर पाटील आदींनी या तपासकामी श्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment