लग्न लावून तरुणाची फसवणूक – दोघांना अटक

On: December 9, 2021 5:11 AM

जळगाव : पर जिल्ह्यातील मुलीसोबत तरुणाचे लग्न लावून द्यायचे आणि वधूला तिच्या अंगावरील दागिन्यांसह लबाडीने परत घेवून जायचे असा फसवणूकीचा प्रकार करणा-या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वर मुलाची फसवणूक झाल्याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोकुळ रवींद्र सोनवणे आणि सोनाली गोकुळ सोनार (दोन्ही रा. साकेगाव हल्ली मुक्काम कांचन नगर जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघा जणांनी आपल्या साथीरांसह एका उपवर तरुणाचा विवाह पर जिल्ह्यातील एका तरुणीसोबत पैसे घेऊन लावून दिला होता. लग्नानंतर वधूची बहीण आजारी असल्याचा बहाणा करुन तिला भेटण्यासाठी जायचे निमित्त करुन वर – वधू अशा दोघांना भुसावळ येथे बोलावण्यात आले होते. अंगावरील दागिन्यांसह आलेल्या वधूच्या रुपातील मुलीला गोकुळ, सोनाली व त्यांचे साथीदार लबाडीने घेऊन गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वर तरुणाने भडगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. वर मुलाची फसवणूक करणा-या टोळीतील गोकुळ सोनवणे आणि सोनाली गोकुळ सोनार या दोघांना अटक करण्यात आली असून टोळी निष्पन्न करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक विनोद पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, ईश्वर पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. बनावट लग्न लावून देत फसवणूक करणारी टोळी या तपासात उघड झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment