विश्वासाने ठेवलेली रक्कम हडपणा-या दाम्पत्याविरुद्ध कारवाई

On: December 9, 2021 7:42 PM

गोंदिया (अनमोल पटले) : मजुरांच्या पगाराची साडे सात लाख रुपयांची रक्कम भाडेक-याने घरमालकाकडे विश्वासाने ठेवली. मात्र मागणी केली असता ऐन वेळी नकार देणा-या दाम्पत्याविरुद्ध तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दाम्पत्याने आपला गुन्हा कबुल करत रक्कम काढून दिली. या प्रकरणी पती पत्नीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रेल्वे लाईनच्या कामावरील कंत्राटदाराचे कर्मचारी लालदू लुटापार रहमान रा. पश्चिम बंगाल हे काचेपाणी येथील ठाकरे दाम्पत्यांच्या घरात भाड्याने राहतात. त्यांच्याकडे मजुरांच्या पगाराची रक्कम होती. ती त्यांनी ठाकरे दाम्पत्याकडे ठेवली होती. मात्र ती देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कसून चौकशीअंती त्यांनी आपला गुन्हा कबुल करत लपवून ठेवलेली रक्कम काढून दिली. त्यांना अटक करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment