मुद्देमालासह मोटार सायकल चोरटे धुळे पोलिसांच्या ताब्यात

On: December 9, 2021 8:08 PM

धुळे : धुळे शहराच्या विविध भागातून मोटार सायकल चोरीचे वाढलेले प्रमाण बघता वरिष्ठांच्या आदेशाने धुळे शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांचे सहकारी तपासकामाला लागले होते.

तपासादरम्यान सोहम सुरेश पाटील (स्वामी नारायण कॉलनी, पवन नगर धुळे), शुभम प्रकाश गोरे (रामचंद्र नगर कॉटन मार्केटच्या मागे धुळे) यांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात निष्पन्न करण्यात आले. त्यांच्याकडून धुळे शहर पोलिस स्टेशन हद्दीतील 1 व इतर ठिकाणी केलेल्या सहा अशा एकूण सात ठिकाणी केलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या मोटार सायकली काढून दिल्या आहेत.

पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार नाना आखाडे, हे.कॉ.दीपक गायकवाड, बालमुकुंद दुसाने, पोलिस नाईक वैभव वाडीले, पो.कॉ.मनीष सोनगिरे, प्रवीण पाटील, तुषार मोरे, अविनाश कराड, प्रसाद वाघ, गुणवंत पाटील, शाकिर शेख, चालक किरण भदाणे, सचिन पगारे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment