जळगाव : कापूस व्यापा-याचा खून करणा-या सहा संशयीत आरोपींचा कौशल्य वापरुन माग काढत उत्कृष्ठ तपास केल्याबद्दल जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकाऱ्यांचा महाराष्ट्राचे अप्पर पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर व पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे उपस्थित होते.

पो.नि.किरणकुमार बकाले यांच्यासह हे.कॉ.जितेंद्र पाटील, राजेश मेंढे, अश्रफ शेख, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, कमलाकर बागुल अशी प्रशस्तीपत्रासह सन्मान झालेल्यांची नावे आहेत.
स्वप्नील रत्नाकर शिंपी (30) या कापूस व्यापा-याची गेल्या महिन्यात 26 नोव्हेंबर रोजी हत्या झाली होती.या प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गु.र.नं. 411/2021 भा.द.वि. 302, 393, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या किचकट गुन्ह्यात सहा आरोपी कुशलतेने निष्पन्न करुन ते धरणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. सदर खूनाचा गुन्हा कमी कालावधीत मात्र तेवढ्याच सरसपणे उघडकीस आणला गेला आहे.
याशिवाय जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे संबधित अधिकारी व कर्मचारी यांचा देखील यावेळी राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढीस लागले आहे.







