अल्पवयीन मुलांनी केली महिला प्राचार्यांकडे चोरी

On: December 10, 2021 7:33 PM

जळगाव : महिला प्राचार्या कृष्णा कठुरीया यांच्या बंद घराचे कुलूप तोडून केलेल्या चोरीच्या घटनेत तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यातील दोघांची बाल निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. तिसऱ्या फरार अल्पवयीन मुलाचा शोध सुरु आहे.

या घटनेतील मुले एमआयडीसी व जामनेर पोलिसांच्या अभिलेख्यावरील बाल गुन्हेगार आहेत. या बाल गुन्हेगारांची टोळी असून त्यांना तांबापुरा परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

पो.नि.प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघा अल्पवयीन मुलांना सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील साहित्य जप्त करण्यात आले. या गुन्ह्यात त्यांच्या सोबत अजून एक अल्पवयीन साथीदार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहेत. दोघा अल्पवयीन बालकांना बाल न्याय मंडळ येथे हजर करण्यात आले. बाल न्यायालयाने त्यांची रवानगी बाल निरीक्षण सुधारगृहात केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment