घरफोडीतील वांटेड आरोपीस अटक

On: December 14, 2021 5:29 PM

जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. हमीदखान अय्युबखान (रा. गणेशपुरी मेहरुण जळगांव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नशिराबाद पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. त्याला एमआयडीसी हद्दीतील काशिनाथ चौकातून अटक करण्यात आली. पुढील तपासकामी त्याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, पोना नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, चा.स.फौ राजेंद्र पवार आदींनी या तपासकामी परिश्रम घेतले. अटकेतील आरोपी हमीद याचा एक साथीदार या पथकाने यापूर्वी अटक केला आहे. त्याच्याकडून या पथकातील पोलिस सहका-यांनी सदर गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला होता. गुन्हा घडल्यापासून व उघडकीस आल्यापासून हमीदखान सुरत येथे पळून फरार झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment