हॉटेल बांधकामावरील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

On: December 14, 2021 10:32 PM

जळगाव : जळगाव औरंगाबाद रस्त्यावर सुरु असलेल्या हॉटेलच्या बांधकामावर झालेल्या चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक लखीराम जेठाणी यांचे हॉटेल निर्मितीचे काम मैत्रेय चौफुलीनजीक सुरु आहे. या कामावरील स्टोअर रुममधून 1 लाख 29 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. यात पॉलीकॅब बंडल, वॉटर मिक्सर, कॅमेरा केबल, नळाच्या तोट्या, पाईप फिटींग साहित्य आदींचा समावेश आहे. सुपरवायझर योगेश शिंदे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment