अवैध दारु साठ्यासह तिघांविरुद्ध कारवाई

On: December 15, 2021 8:11 PM

जळगाव : जळगाव तालुका पोलिसांच्या पथकाने तिघा जणांकडून दारुचा अवैध साठा हस्तगत केला आहे. 14 डिसेंबरच्या रात्री करण्यात आलेल्या कारवाईत दिलीप सुकलाल कोळी (रा.आमोदा खुर्द ता. जळगाव), भास्कर चिंतामण पाटील (रा.डिकसाई ता.जळगाव), मंगा झिपरु भिल (रा. आमोदा ता.जळगाव) या तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध प्रोहिबिशन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस उप निरीक्षक नयन पाटील, पोलीस हवालदार विश्वनाथ गायकवाड, नरेंद्र पाटील, प्रकाश चिंचोरे, दिपक कोळी, अशोक महाले, संजय भालेराव व अनिल तायडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment