ब्राऊन शुगर प्रकरणातील म्होरक्या पोलिसांच्या जाळ्यात

On: December 19, 2021 3:08 PM

जळगाव : रावेर येथील ब्राऊन शुगरच्या कारवाईतील मुख्य सुत्रधारास अटक करण्यात आल्याचे समजते. काळ 18 डिसेंबर रोजी रावेर येथे एक कोटी 8 हजार रुपये किमतीच्या 509.4 ग्रॅम वजनाच्या ब्राऊन शुगरसह अख्तरी बानो या महिलेस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह रावेर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या निर्देशनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, परेश महाजन, चालक दीपक चौधरी आदींच्या पथकाने रातोरात मंदसौर येथे सापळा रचून मुख्य सूत्रधार असलेल्या सलीम खान यास जेरबंद केले. आज सकाळी त्याला आणल्यानंतर त्यास रावेर पोलिसांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरु असल्याचे समजते.

सदर महिला ही या गुन्ह्यातील अंमली पदार्थ वाहतूक करणारी असून सलीम खान शेर बहादूर खान (मंदसौर मध्य प्रदेश) हा मुख्य आरोपी आहे. याच्या मार्फत ड्रग्जचा व्यवसाय सुरु असल्याची माहीती समोर येत आहे. अटकेतील म्होरक्याकडून अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटची माहिती समोर येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment