महिलेची हत्या करुन पुरला मृतदेह?

On: December 20, 2021 6:49 PM

जळगाव : जळगाव शहराच्या शिवाजी नगरातील एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह तापी नदीच्या पात्रात पुरल्याची घटना उघडकीस आल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.

माया दिलीप फरसे (51) रा. क्रांती चौक शिवाजी नगर जळगाव या गेल्या 15 तारखेपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी शोधाशोध करुनही त्यांचा तपास लागला नाही. त्यामुळे या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यांचा मृतदेह विदगाव पुलाजवळ तापी नदी पात्रात मिळून आला. तपासात तालुका पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. दोघांनी हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. जादूटोणा प्रकारातून हा गुन्हा घडल्याची चर्चा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment