अट्टल मोबाईल चोरटा एलसीबीच्या जाळ्यात

On: December 23, 2021 8:23 PM

जळगाव : फोन करण्यासाठी मोबाईल फोन मागून तो घेतल्यानंतर पसार होणा-या अट्टल चोरट्यास जळगाव एलसीबी पथकाने अटक केली आहे. जाफर राजू शेख (इस्लामपुरा जामनेर) असे या आरोपीचे नाव आहे.

जामनेर शहरात जाफर शेख हा चोरीचे मोबाईल विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजल्यानुसार त्यांनी आपल्या पथकातील सहकाऱ्यांना त्याला ताब्यात घेण्याकामी रवाना केले होते. त्यास जामनेर येथून ताब्यात घेत त्याची अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडे दहा हजार रुपये किमतीचा रेडमी – 10 प्राईम कंपनीचा मोबाईल मिळून आला. या मोबाईल चोरीप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.सुनिल दामोदरे, दिपक पाटील, संदीप सावळे, पोना प्रमोद लाडवंजारी, पोना किरण धनगर, पो कॉ. ईश्वर पाटील, चापोहेकॉ भारत पाटील आदींनी या तपासात सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment