गुरांची वाहतूक करणा-यांविरुद्ध गुन्हा दाखल

On: December 28, 2021 8:43 PM

जळगाव : गुरांची वाहतूक करणा-या तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील हॉटेल दयानंद नजीक गुरांची अमानवी पद्धतीने वाहतूक करणा-या संशयीत आयशर या वाहनाला चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात गुरांची अमानवी पद्धतीने वाहतूक होत असल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी आयशर (एमएच १८ बिजी ५३७७) या वाहनासह तिघांविरुद्ध रीतसर कारवाई करण्यात आली आहे. आयशर चालक साहिल उर्फ सिकंदर खान (१८), मुक्तार उर्फ बबलू युसुफ खान (४०) दोघे रा. मध्य प्रदेश तसेच गुरांचा मालक फिरोज (रा. सोनगीर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारीई करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment