भुसावळ शहरातून गांजा जप्त

On: December 30, 2021 10:28 AM

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने काल रात्री सुमारे ३३ किलो गांजा जप्तीची कारवाई केली आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे भुसावळ शहरात घडत असून त्या गुन्ह्यांचा उलगडा देखील तातडीने होत आहे. मात्र असे असले तरी गुन्हेगारीचे प्रमाण देखील कमी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त  केली जात आहे. गुन्हेगारीच्या क्षेत्रात भुसावळ शहर हे एक संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात असून भुसावळ शहर व तालुका या दोन पोलीस स्टेशनच्या तुलनेत बाजारपेठ पोलीस स्टेशनचा क्राईम रेट अधिक असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment