तीन हजाराची लाच पंचायत समिती लिपिकाच्या अंगाशी

ACB-Crimeduniya

जळगाव : गाईचा गोठा (शेड) बांधण्यासाठी मंजूर प्रकरणाचे बांधकाम सुरु करण्यासाठी कार्यादेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागणे जामनेर पंचायत समितीच्या लिपिकाच्या अंगाशी आले आहे. वसंत पंडित बारी असे लाचेची मागणी व स्वीकार या दोन्ही घटनेत अडकलेल्या लिपिकाचे नाव आहे. जामनेर पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव पथकाच्या सापळ्यात वसंत बारी अडकल्याने खळबळ माजली आहे.

शेवगेपिंप्री ता. जामनेर येथील तक्रारदाराचे गोठा बांधणीचे प्रकरण मंजूर झाले होते. या बांधकामाचा कार्यादेश मिळवून देण्याकामी लाचखोर लिपिक वसंत बारी याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. सापळ्याची सर्व कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने बारी याच्यावर झडप घालत त्यास ताब्यात घेतले.

डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव, पो.नि. एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here