ट्रँक्टरमधील बँटरीसह चोरटा अटकेत

On: January 20, 2022 6:38 PM

जळगाव : ट्रँक्टरमधील बँटरी चोरणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शोधून अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. आतिष नरेश भाट (नवल कॉलनी जळगाव) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.

दिलीप शिवप्रकाश चांगरे (रा. नवल कॉलनी जळगाव) यांच्या कडे असलेल्या ट्रँक्टरमधील बँटरी चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि. प्रताप शिकारे यांच्या अखत्यारीत असलेल्या गुन्हे शोध पथकाने शोध घेत आतिष नरेश भाट यास या गुन्ह्याकामी निष्पन्न करत अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून त्याने चोरी केलेली बँटरी हस्तगत करण्यात आली आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक हेमंत कळसकर, सुधीर सावळे, विकास सातदिवे, योगेश बारी, चंद्रकांत पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment