सेवानिवृत्त पंचायत समिती कर्मचारी बेपत्ता

On: January 22, 2022 10:37 AM

जळगाव : स्वामी समर्थ मंदिरात जावून येतो असे सांगून गेलेले भडगाव येथील पंचायत समितीचे सेवानिवृत्त कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. सर्जेराव भीमराव पाटील (महालक्ष्मी कॉलनी, नाचणखेडा रोड भडगाव) यांच्या बेपत्ता झाल्याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली असून त्यांचा शोध सुरु आहे.

सर्जेराव पाटील हे 15 जानेवारी रोजी सकाळी घरातून मंदिरात जाण्यासाठी घरातून गेले. मात्र अद्याप ते घरी आले नसल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत. अखेर त्यांची पत्नी निर्मला पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी मिसिंग दाखल केली आहे. फोटोत दर्शवलेले सर्जेराव पाटील कुणाला आढळल्यास भडगाव पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment