लाचखोर फरार पोलिसाची सेवानिवृत्ती रद्द

On: January 22, 2022 11:43 AM

धुळे : खासगी व्यक्तीच्या माध्यमातून नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकाकडे तडजोडीअंती 2 लाख 80 हजार रुपयांची मागणी करणा-या आखाडे आडनावाच्या पोलीस कर्मचा-याची सेवानिवृत्ती रद्द करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. पोलीस खात्याची दिशाभूल करत आजारपणाचे कारण दाखवत आखाडे याने सेवानिवृत्ती घेतल्याचे म्हटले जात आहे. लाच मागणीत सहभाग घेणा-या खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

लाचखोरीच्या प्रकरणासह आखाडे याची सेवानिवृत्ती देखील चर्चेत आली आहे. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता असे म्हटले जाते. पोलीस खात्याची दिशाभूल करत आखाडे याने सेवानिवृत्ती घेतल्याचे म्हटले जात आहे. सेवानिवृत्तीसाठी एका विशिष्ठ स्वरुपाच्या प्रक्रियेतून जावे लागते. आजारपणाचे कारण सांगितल्याने आखाडे यास सेवानिवृत्ती देण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment