स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या दोघांवर अंत्यसंस्कार

On: January 23, 2022 10:33 AM

जळगाव : भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय शिवारात असलेल्या कंपनीत फर्निश ऑइलने भरलेल्या टाकीला वेल्डिंग करत असतांना झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता. या दोघा कामगारांवर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भुसावळ शहरापासून सुमारे १४ किमी अंतरावर दिव्या कॉपर मास्टर अलाईस अ‍ॅण्ड कंपनी आहे. या कंपनीत २१ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता ऑइलच्या टाकीला वेल्डिंग करत असतांना स्फोटाची घटना घडली होती. या घटनेत काशीनाथ फत्तू सुरवाडे (रा.खेडी रोड, जळगाव) आणि खेमसिंग हेमराज पटेल (रा.बेमतेरा, छत्तीसगड) या दोघा कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment