कंपनीतील सामान चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक

On: January 25, 2022 5:20 PM

जळगाव : एमआयडीसी परिसरातील एस.एस.डी.फुड्स या कंपनीतील 41 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण यास अटक करण्यात आली आहे.

1 व 2 जानेवारीच्या रात्रकालीन प्रहरात दिनकर चव्हाण याने जळगाव एमआयडीसी परीसरातील सेक्टर एच 22/2 येथील एसएसडी फुडस या कंपनीच्या आवारातुन 3 मोठया मोटार, लोखंडी दातेरी 03 गिअर, 24 इंच व्यास असलेली पुल्ली, 20 इंच व्यास असलेल्या 10 पुल्ली, वेल्डींग मशीनची वायर, लोखंडी स्टॅण्ड असा सुमारे 41 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी किशोर रमेशलाल कटारीया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या गुन्हे शोध पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद किशोर पाटील, मुकेश पाटील, सुधीर सावळे, सचिन पाटील, मुदस्सर काझी आदींनी दिनकर चव्हाण या रेकॉर्डवरील गुन्हेगारास सुप्रीम कॉलनी परीसरातुन ताब्यात घेत अटक केली. त्याने सदर चोरीचा गुन्हा कबुल केला आहे. अटकेतील दिनकर चव्हाण हा पोलीस स्टेशनचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर 16 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. अटकेतील आरोपी दिनकर चव्हाण याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment