विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कारवाईत गुटखा जप्त

On: February 4, 2022 12:52 PM

नाशिक : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या कारवाईत वाहनासह विमल गुटख्याने भरलेले 113 पोते जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत गुटख्याने भरलेल्या 113 पोत्यांसह आयशर वाहन, मोबाईल असा एकुणा 57 लाख 27 हजार 315 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 45 लाख 26 हजार 315 रुपये एवढी आहे.

चालक अतुल अशोक शिंदे रा.नाशिक यास अटक करण्यात आली आहे. गुटख्याचा गोडाऊन मालक वाजदा (गुजराथ) हा असून गुटखा विकत घेणारे राजु कोठावदे (रा.मालेगाव), सुनिल अमृतकर (रा.नाशिक), माँन्टी (रा.नाशिक) असे फरार झाले आहेत. पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत. या कारवाईत पो.नि. बापु रोहोम यांच्यासह स.पो.नि.सचिन जाधव, सहायक फौजदार बशीर तडवी, हे.कॉ. सचिन धारणकर, रामचंद्र बोरसे, पोलिस नाईक मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलीक, सुरेश टोगांरे आदींनी सहभाग घेतला. याप्रकरणी देवळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवळा पोलिस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment