जळगाव : रात्री उशिरापर्यंत ढोल वाजवू देण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने बालाणी रिसॉर्ट मॅनेजरला फायटरने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिसॉर्ट मॅनेजर विनोद जगन्नाथ वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सागर पहिलवान (पुर्ण नाव माहिती नाही) विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7 फेब्रुवारीच्या रात्री उशिरापर्यंत ढोल वाजवण्यास मनाई केल्यामुळे सागर पहिलवान यास राग आला. या रागाच्या भरात मॅनेजर वाघ यांच्या तोंडावर, गालावर व पोटावर फायटरने मारल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास जितेंद्र राजपूत तपास करीत आहे.







