स.पो.नि. संग्राम ताटे अजूनही बेपत्ताच

On: February 10, 2022 5:28 PM

जालना : पदोन्नती झालेले व सध्या एसीबीत कार्यरत असलेले स.पो.नि. संग्राम ताटे नऊ दिवस उलटल्यानंतर देखील बेपत्ताच आहेत. दहा मिनिटात परत येतो असे पत्नीला सांगुन घरातून बाहेर गेलेल्या स.पो.नि. ताटे यांचा अद्याप शोध लागलेला नाही. 

त्यांचा मोबाइल घरी असल्यामुळे तपासकामी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला आहे. एका सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत त्यांच्या सांगली येथील एका मित्राचा जवाब घेण्यात आला असला तरी त्यांचा तपास मात्र लागला नसल्याने त्यांचे कुटूंबीय चिंतेत पडले आहेत. स.पो.नि. ताटे हे कदाचीत विपश्यना केंद्रात गेले असावेत अशा एका तर्काच्या आधारे देखील तपास लावला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment