पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-या तरुणाची हत्या

On: February 14, 2022 12:38 PM

धुळे (दोंडाईचा) : पत्नीला  शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-या तरुणाची कोयता व रॉडने हल्ला करत हत्या केल्याची घटना दोंडाईचा शहरात घडली. अरुण तिरमले असे मयताचे तर सागर तिरमले असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी दोंडाईचा पोलिस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकरी सागर यास अटक करण्यात आली आहे.

मयत व मारेकरी यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसना शिवीगाळ करण्यात झाले होते. दरम्यान हल्लेखोर सागर याने मयत अरुण याच्या पत्नीला अश्लिल शिवीगाळ केली. या प्रकराचा त्याने मारेकरी सागर यास जाब विचारला असता त्याच्यावरच हल्ला चढवला. या हल्ल्यात अरुण हा मयत झाला. राहुल भाईदास तिरमले याने दिलेल्या तक्रारीनुसार दोंडाईचा पोलिस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment