रोजच्या वादातून पतीने केली पत्नीची हत्या

On: February 15, 2022 12:44 PM

पुसद : दररोज किरकोळ कारणावरुन होत असलेल्या वादातून संतापात पतीने पत्नीला चाकूच्या घावात जखमी केले. उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाल्याची घटना पुसद शहरातील मोती नगर भागात घडली. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पुष्पा जगदीश घेनेकर (60) असे मयत वृद्ध महिलेचे तर जगदीश गणपत घेनेकर (65) असे हल्लेखोर पतीचे नाव आहे.

पुसद शहरातील मोती नगर येथे पुष्पा घेनेकर आणि जगदीश घेनेकर या पती-पत्नीत दररोज किरकोळ कारणावरुन वाद होत असे. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या वादाची परिणिती चाकू हल्ल्यात  झाली.  त्यातून पुष्पा घेनेकर यांचा मृत्यू झाला. यआप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment