डॉ. सुवर्णा वाजे हत्येप्रकरणी अजुन एक ताब्यात

On: February 17, 2022 4:39 PM

नाशिक : नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा पती संदिप वाजे याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हसके असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. संदिप वाजे याने दिलेल्या कबुलीतून बाळासाहेब म्हसके याचे नाव पुढे आले आहे.अटकेतील संदिप वाजे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांचा जळालेला मृतदेह कारमधे आढळून आला होता. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ माजली होती. पत्नीच्या हत्येप्रकरणी वाजे यास अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहेत. त्याचा मित्र बाळासाहेब म्हसके याच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment