फोटो काढण्यास आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

On: February 17, 2022 4:56 PM

बीड : फोटो स्टुडिओत फोटो काढण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर दोघा तरुणांनी अत्याचार केल्याची घटना धारुर शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी धारुर पोलिस स्टेशनला दोघांवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पासपोर्ट फोटो काढण्यासाठी नरसिंह फोटो स्टुडिओ येथे अल्पवयीन मुलगी आली होती. फोटोग्राफर मधूर फरताडे याने तिचा फोटो काढला. त्यानंतर तिला काही वेळाने फोटो न देता त्याने तिला दुस-या दिवशी बोलावले. दुस-या दिवशी फोटोग्राफर मधुर फरताडे याच्यासोबत त्याचा साथीदार सहदेव चाळक हा देखील होता. दोघांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment