विशेष महानिरीक्षकांच्या बंगला परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी

On: February 18, 2022 12:50 PM

नाशिक : नाशिक शहरात सर्वात सुरक्षीत समजल्या जाणा-या विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या बंगला आवारातच चोरी झाली असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरट्यांनी या बंगल्याच्या आवारातून चक्क चंदनाची झाडे कापून नेली आहेत. या चोरीमुळे चंदनचोरांनी पोलिस यंत्रणेला एक प्रकारे आव्हान दिले असल्याचे म्हटले जात अअहे.

विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या बंगल्यावर तैनात पोलिस कर्मचारी अमोल बर्वे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी चक्क कटर आणून खोडासह विस वर्ष जुनी चंदनाची झाडे नेली आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका घटनेत सातपुर पोलिस स्टेशन हद्दीत देखील चंदनाच्या झाडांची चोरी झाली असून याप्रकरणी सातपुर  पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment