पाच जणांच्या सामुहीक आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अनुत्तरीत

On: February 22, 2022 10:55 AM

धुळे : धुळे शहरानजीक अवधान परिसरात एकाच परिवरातील पाच जणांनी सोमवारी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. विषारी द्रव्य प्राशन करणा-या पाचपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील मुळ रहिवासी असलेले गणेश गोपाळ हे परिवारासह धुळे शहरानजीक अवधान भागात भाड्याच्या खोलीत रहात होते. गणेश (36), त्यांची पत्नी सविता (34), मुलगी जयश्री (14), मुलगा गोविंद (12) व त्यांच्यासोबत राहण्यासाठी आलेला भरत पारधी (26) अशा पाच जणांनी विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरमालकाने त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यातील भरत पारधी याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमागचे कारण अस्पष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment