जळगाव शहरात सेवानिवृत्त अधिका-याकडे चोरी

On: February 23, 2022 8:08 PM

जळगाव : जळगाव शहरातील मानराज पार्क – दांडेकर नगर परीसरातील सेवानिवृत्त अधिका-याकडे चोरट्यांनी हात की सफाई केली आहे. सत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूर फेडरेशनचे सेवानिवृत्त अधिकारी अरविंद भास्कर निकम यांच्या बंद घरात हा चोरीचा प्रकार 20 ते 21 फेब्रुवारीच्या रात्री घडला आहे.

सोने चांदीच्या वस्तूंसह टीव्ही देखील चोरट्यांनी गायब केला आहे. अरविंद निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग 5 गु.र.न. 40/22 भा.द.वि.380, 457, नुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment