बीड पोलिस अधिक्षकांविरुद्ध पोस्ट – आप जिल्हाध्यक्षांवर गुन्हा‎

On: February 27, 2022 12:58 PM

बीड : जमीनीच्या वादातून शुक्रवारी बीड‎ शहरात गोळीबारीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिस अधिक्षकांनी राजीनामा द्यावा अशा मजकुराची पोस्ट फेसबुकवर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी टाकली होती.

याप्रकरणी अशोक येडे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही‎ काळापासून बीड जिल्ह्यात गंभीर घटना‎ घडत असल्याने पोलिस अधीक्षकांनी राजीनामा‎ द्यावा, अशी फेसबुक पोस्ट सोशल‎ मीडियावर टाकली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment