राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जैन हिल्सवर आगमन

On: February 27, 2022 9:18 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी 5 वाजून 50 मिनीटांनी जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते लागलीच जैन हिल्सवर दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या जळगाव दौ-यावर आले आहेत. उद्या ते कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात भेट देणार आहेत.

जळगाव विमानतळावर आगमन प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जैन इरिगेशनचे अतुल जैन यांनी त्यांचे स्वागत केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment