बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

जळगाव : गुजरात राज्यातून बलात्काराच्या गुन्ह्यात वारंटमधील फरार आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मुकेश अशोक पाटील (25) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अहमदाबाद सत्र न्यायालयाकडील आर.सी.सी.क्रमांक 239/22 मधील मुकेश अशोक पाटील हा आरोपी आहे. अल्पवयीन मुलीस पळवून नेवून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरुद्ध अहमदाबाद येथील अलिस ब्रिज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. भा.द.वि. 363, 366, 376 तसेच पोस्को कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर वारंट मधील फरार आरोपी मुकेश पाटील हा जळगाव येथील सुप्रिम कॉलनी भागात रहात असल्याची माहिती गुजरातमधील अलिसब्रिज पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे यांना दिली होती. या माहितीच्या आधारे आज 6 मार्च रोजी दुपारी त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.
पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. मिलींद सोनवणे, पोलिस नाईक हेमंत कळसकर, पोलिस नाईक विकास सातदिवे, सुधिर साळवे तसेच पो.कॉ. चंद्रकांत पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here