दोघा शालकांना भोसकले – एक ठार

On: March 7, 2022 11:17 AM

मालेगाव : बहिणीला सतत त्रास देणा-या मेहुण्याला जाब विचारणा-या दोघा शालकांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेत एक जखमी तर दुसरा ठार झाला आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहमंद इम्रान उस्मान गनी असे अटक करण्यात आलेल्या संशयीत हल्लेखोराचे नाव आहे. मोहंमद अहमद मुईयुद्दीन (30) असे चाकू हल्ल्यात ठार झालेल्याचे तर मोबीन अहमद असे जखमीचे नाव आहे.

मालेगाव शहरातील नवरंग कॉलनीत शनीवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ माजली होती. या घटनेनंतर संशयित हल्लेखोर मोहमंद याने त्याच्या डोक्यावर वार करत स्वत:ला जखमी करुन घेतले. तो त्याच्या पत्नीला नेहमी मारहाण करत असे. त्याबद्दल जाब विचारण्यासाठी त्याचे दोन्ही शालक गेले होते. दरम्यान त्याने दोघांवर केलेल्या चाकू हल्ल्यात एक जखमी व एक उपचारादरम्यान ठार झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment