एकतर्फी प्रेमातून तरुणीला भोसकून प्राशन केले विष

On: March 7, 2022 11:36 AM

सातारा : कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे या गावी एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीला चाकूने भोसकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत वैद्यकीय उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यु झाला. घटनेनंतर हल्लेखोर तरुण स्वत:हून कोरोगाव पोलिस स्टेशनला दाखल झाला. मात्र त्याने विषारी द्रव घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निखिल राजेंद्र राजे (26), रा. पिंपोडे बुद्रुक असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

सातारा जिल्ह्यातील पिंपोडे येथील रहिवासी असलेल्या निखिलचे मयत झालेल्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तो सतत तिची छेडखानी करत असे. रविवारच्या दिवशी ती क्लासला जात असतांना त्याने तिला त्रास दिला. तिने प्रतिसाद न दिल्याने संतापात त्याने तिला भोसकून ठार केले. मात्र त्यानेही नंतर विषारी पदार्थाचे सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment